सिल्लोड आगाराचे वाहक संदीप इंगळे यांचे अनोखे रक्षाबंधन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर नात्यांची आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्याचा दिवस आहे. सिल्लोड आगारातील वाहक संदीप इंगळे हे आपल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी परिचित आहेत. 

रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांनी जळकी ता. सिल्लोड येथील मुलींसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमात प्रत्येक मुलीला वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यासोबतच शाळेतील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वर्ग व पाढे, विज्ञान विषयाचे चार्ट, सापांच्या विविध जातींची माहिती असलेले तक्ते तसेच मिश्र खते कशी तयार करावीत याबाबत माहितीपूर्ण तक्ते भेट देण्यात आले. 

शिक्षणाची साथपर्यावरणाची जपणूक सामाजिक बांधिलकीची भावना या तिन्हींचा सुंदर संगम घडवून आणणारे हे रक्षाबंधन व निश्चितच ङ्गअनोखे रक्षाबंधन ठरले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संदीप इंगळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.